Monday, January 12, 2015

इप्टा, पुणे आयोजित आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धा

ए. के. हनगल करंडक (प्रथम पारितोषिक) श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय यांना मिळाले. द्वितीय पारितोषिक एम आय टी अभियांत्रिकी महाविद्यालय तर तृतीय पारितोषिक एम एम एम सी सी या महाविद्यालयाला यांना मिळाले. 

स्पर्धेचे हे १२ वे वर्ष आहे. यंदा स्पर्धेच्या उद्घाटनास इप्टा महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री कृष्णकांत कुदळे, स प महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पद्मजा घोरपडे, इप्टा पुणे चे अध्यक्ष श्री अमित कांबळे, सचिव श्री अमृत सामक हे उपस्थित होते. 

बक्षीस समारंभ सन्माननीय रंगकर्मी श्री अतुल पेठे व श्री अजित सातभाई यांच्या हस्ते झाले
याप्रसंगी बोलताना श्री अतुल पेठे यांनी उपस्थित तरुणाईला शाश्वत विचारसारणी, कला सादर करण्यामागचे उद्देश कलेतून कसे प्रभावीपणे मांडता येतील याचे मार्गदर्शन केले. तसेच कलेची ताकद ओळखून त्याचा योग्य वापर करावा, त्यामुळे स्वत:च्या आणि जनसामान्याच्या जगण्यात सकारात्मक बदल घडवावा असे आवाहन केले. 

स्पर्धेचे परीक्षण सर्वश्री डॉ अजय जोशी, मिलींद शिंत्रे, अशोक काळे यांनी केले.परिक्षक श्री मिलींद शिंत्रे आणि डॉ अजय जोशी यांनीही स्पर्धकांशी संवाद साधला 

No comments:

Post a Comment